खिरमाणी गावाची माहिती

१) स्थान :-
उमराणे हे गाव मुंबई – आग्रा महामार्गावर नाविंक पासून ८५ कि.मी. तसेच देोळा तालुका मुख्यालयापासून १९ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेती आधारित उत्पादनांच्या व्यापाराचा आहे.

तालुका मुख्यालयाच्या पूर्व दिशेला वसलेले उमराणे हे गाव तालुका मुख्यालयापासून १९ कि.मी. अंतरावर आहे. गावाच्या पूर्वेस वडसगाव, पश्चिमेस दहीवडी, दक्षिणेस शिंदी (वन) व उत्तरेस डोंगरगाव असून, २०.४२३०८६८ अक्षांश व ७४.३३५९७६५ रेखांशावर हे गाव वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ३५.२०४१ चौ.कि.मी. आहे.

ग्रामपंचायत अविकारी: श्री. जगन्नाथ रामभाऊ शिंदे (मो. ९५४५३४८०६३)
सरपंच: सौ. कमल विश्वासराव देहरे (मो. ९०११०७६०५१)
उपसरपंच: सौ. विमल भाऊसाहेब देहरे (मो. ९८९०६९१०४६)


२) हवामान व पर्जन्यमान :-
हवामान : कोरडे / समशीतोष्ण / दमट आहे.
गावाचे सरासरी तापमान २५˚ सेल्सिअस आहे. उन्हाळ्यात तापमान ४५˚ सेल्सिअसपर्यंत वाढते तर हिवाळ्यात १०˚ सेल्सिअसपर्यंत कमी होते.

पर्जन्यमान : गावाचे सरासरी पर्जन्यमान ६१४ मि.मी. आहे. मागील वर्षी गावात अंदाजे ७४१ मि.मी. पाऊस पडला.


३) भूमीचे क्षेत्र :-
गावातील शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र २१.१९ हेक्टर असून, बागायत क्षेत्र … हेक्टर, जिरायती क्षेत्र … हेक्टर, पडीक क्षेत्र … हेक्टर व जंगलव्याप्त क्षेत्र … हेक्टर आहे.


४) लोकसंख्या विषयक :-
गावाची एकूण लोकसंख्या १०,६४६ असून, त्यापैकी पुरुष ५,५१३ आणि महिला ५,१३३ आहेत.
गावातील एकूण लोकसंख्येपैकी २,६८५ अनुसूचित जाती व जमातीतील लोक आहेत.
गावात एकूण २,२३६ कुटुंबे असून, काही कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील आहेत.

साक्षरता :
गावात एकूण ८,८५८ साक्षर असून साक्षरतेचे प्रमाण ८३.२% आहे. पुरुष साक्षरतेचे प्रमाण ४३.०८% व महिलांचे ४०.११% आहे.


५) बांधकाम विषयक :-
गावात एकूण २४८७ घरे आहेत, त्यापैकी

  • दगडमाती माळीची घरे – २००

  • आर.सी.सी. स्लॅबची घरे – १५००

  • विटांच्या भिंती व पत्र्यांच्या छपरांची घरे – ७८७

  • कडाची घरे – …


६) व्यवसाय वर्गीकरण :-
गावात एकूण ४०० नोकरी करणाऱ्या व्यक्ती आहेत.
शेती व्यवसायात ४९८० व्यक्ती गुंतलेल्या आहेत.
गावात ३०० भूमिहीन मजूर असून ४०० व्यक्ती विविध व्यावसायिक व उद्योगांत गुंतलेल्या आहेत.


७) पशुधन :-
गावात एकूण ५७२८ जनावरे आहेत:

  • बैल – ७४५

  • गायी – ९२८

  • म्हशी – २९९

  • शेळ्या – ९१४

  • मेंढ्या – १७५२

  • कोंबड्या – ९५९

  • इतर – १३१